जामनेर (प्रतिनिधी)
देशात कोरोना मूळे सगळीकडे ३ में पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात काल जिल्हाधिकारी साहेब यांनी शहरी भागात जीवनावश्यक वस्तूंचे दुकानाची ११ ते ५ यावेलेचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
परंतु ग्रामीण भागात दूध केंद्र, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ग्राहक शक्यतोवर सकाळी किंव्हा संध्याकाळी घरा बाहेर पडत असतात. तसेच दूध केंद्रावर दूध संकलन व विक्री सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत होत असल्याने ग्राहक वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.
जामनेर तालुका तहसीलदार शेवाळे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काल दिलेले आदेश हे महानगर पालिका, नगरपालिका व नगरपंचायत याभागात लागू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने घाबरून न जाता संचार बंदी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन न करता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावर गर्दी करू नये असे आवाहन देखील तहसीलदार यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे दुकान हे जामनेर व शेंदुर्णी वगळता ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामीण भागात रोजच्या नियमित वेळेत दिवस भर सुरू राहणार असून ग्राहकांनी गर्दी न करता सोशल डीस्टेन्सिंग चा वापर करीत खरेदी विक्री करून पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे.
तसेच विनाकारण घराबाहेर पडून जमावबंदी आदेश मोडण्याचा प्रयत्न केल्यास १४४ व १८८ कलम अंतर्गत कारवाई करण्यात येईल
