पश्चिम महाराष्ट्र चिफ ब्युरो-सुभाष भोसले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधुन पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने संघटनेतील सभासदांना वैयक्तिक अपघाती विमा यावेळी देण्यात येत आहे.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य संपुर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्याचप्रमाणे शासकीय नियमांचे भान ठेवून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. याचप्रमाणे पत्रकारांच्या सुरक्षेकरिता अपघाती विमा सुद्धा देण्यात येत असतो.
तसेच पत्रकारांना विविध भागात जाऊन बातम्या मिळविण्यासाठी धडपड करावी लागत असते. व या धडपडीत पत्रकारांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. पुढे या झालेल्या अपघातात आर्थिक परिस्थितीचा सामनाही त्यांना करावा लागतो.
यासाठी पत्रकार संघटनेच्या सदस्यांना आर्थिक परिस्थितीत आधार मिळावा याकरिता पत्रकार उत्कर्ष समिती या संघटनेद्वारे भीम जयंतीचे औचित्य साधत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अपघाती विमा देण्यात येत आहे.
हा विमा वैयक्तिक असून संबंधित व्यक्तीला अपघात झाल्यानंतर खिशाला कात्री लागू नये व वेळेवर आपला उपचार व्हावा यासाठी कमी खर्चात हा विमा काढून देण्यात आला आहे. असे पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
