पश्चिम महाराष्ट्र चिफ ब्यूरो महाराष्ट्र माझा-सुभाष भोसले
दिनांक १२ एप्रिल २०२० रोजी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (आय ए एस एस ) हे सायंकाळी अंधार पडल्यावर असंख्य खगोलप्रेमी कोल्हापूरकरांनी उघड्या डोळ्यांनी अनुभवले , हे स्थानक पश्चिम आणि उत्तर या दिशांच्या मधून म्हणजे वायव्य दिशेतून ७वा. २२ मिनिटांनी वर येऊन दिसायला लागले, शुक्र ग्रहापेक्षा किंचित कमी तेज असलेले ISS पश्चिमेला चमकणारा शुक्र ग्रह आणि कृत्तिका तारकासमूह यांच्यामधून पुढे सरकून पुढील रोहिणी तारका समूहातून पुढे जात मृग नक्षत्रात पोहोचले, मृग नक्षत्रातील ओरायन तेजोमेघा च्या अगदी जवळून जात हे पुढे दक्षिण- पूर्व आकाशात दिसेनासे झाले, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे साडेतीनशे किलोमीटर उंचीवर आणि प्रतिसेकंद ७६६ किलोमीटर म्हणजेच प्रति ताशी २७६०० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने आणि क्षितिजाच्या वर ४० ते ५० अंश उंचीवर फिरत पृथ्वीप्रदक्षिणा घालणारे आय, एस ,एस , आज सायंकाळी सलग चार मिनिटे कोल्हापूरकरांनी आणि जिल्ह्यातील बहुसंख्य खगोलप्रेमींना प्रत्यक्ष पाहिले अशी प्रतिक्रिया खगोल अभ्यासक किरण गवळी (९९२२६६६१११) यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे अनेक खगोल प्रेमींनी घेतले दर्शन -किरण गवळी,खगोल अभ्यासक
