कोल्हापूर प्रतिनिधी :- प्रा. ङाॅ. सौ. स्मिता सुरेश गिरी.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला असून कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामिण भागातील सामाजिक बांधिलकीतून अनंतशांती सामाजिक संस्थेमार्फत चंद्रे ता.राधानगरी येथे ग्रामस्थानां मोफत मास्कचे वाटप पत्रकार आनिल पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी भगवान गुरव यांनी मार्गदर्शन करताना कोरोना विषयी कामगार एक महिना राबत आहेत स्वच्छता औषध फवारनी तसेच कोरोणा विषयी स्पिकर वरुन जनजागृती करने गावातील जेष्ठ मंडळींना घरातच बसुन राहण्याचा सल्ला देने आशी अनेक कामे स्वताच्या जिवाची पर्वा न करता राबत आहेत अशा लोकांना संस्थे मार्फत शेकङो मास्क देण्यात आले . शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. संस्थेने पुर काळात कोल्हापुरमध्ये 10 आरोग्य शिबीर घेवुन एक सामाजिक बांधिलकी जपली होती व येथुन पुढे हि सामाज कार्याचे कार्य करत राहण्याचे ग्वाही दिली
अनंतशांती संस्थेमार्फत ग्रामस्थानां मोफत मास्क चे वाटप प्रसंगी पत्रकार आनिल पाटील , आप्पासाहेब पाटील , निशांत पाटील आनिल हळदकर .प्रा. एन ङी पाटील ,संतोष पाटील , मारूती पाटील , अवधूत पाटील , दयानंद हळदकर ,विनायक हळदकर , संग्राम पाटील ,मोहन साठे , जगन्नाथ नाईक ,समीर पाटील ,आर एस मोरे आदी शेकङो ग्रामस्थ उपस्थित होते .,