पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चिफ-सुभाष भोसले
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण इयत्ता दहावी विद्यार्थ्यांची भूगोल विषयाची परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय १५एप्रिल नंतर जाहीर करणार होता , आपले मंत्रिमंडळ व सर्व अधिकारी,कर्मचारी कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिशय उत्कृष्टपणे काम करीत आहात .तरी या संकटावर मात करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी लॉकडाउन व संचारबंदी ३० एप्रिल पर्यंत वाढवल्याचे जाहीर केलेले असल्याने राज्यातील सदर १८लाख ६४हजार विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता इतिहास ,ना.शास्त्र व भूगोल या विषयाच्या परीक्षेपैकी ४० गुणांची इतिहास व ना. शास्त्र विषयाची परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन (प्रात्यक्षिक परीक्षा) २०गुण असे एकूण ६० गुणांची परीक्षा पूर्ण झालेली आहे त्या आधारे सरासरी काढून भूगोल विषयासाठी ४० पैकी गुण निर्धारित करून १००पैकी गुण देण्यात यावेत, तसेच इयत्ता ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वर्षभर केलेल्या सर्वकष, सातत्यपूर्ण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण निर्धारित करून पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्वरित निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा अशी विनंती व मागणी सांगली जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश शिक्षक कॉग्रेस प्रा अरविंद जैनापुरे यांनी केली आहे तसेच बालभारतीच्या माध्यमातून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी e books संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.