प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी,
कोल्हापूर.
सुभाष भोसले~कोल्हापूर
भारत हा विविधतेने नटलेला, विविध जाती – धर्माचे लोकं एकत्र त्यांचे सण समारंभ साजरे करत असलेला देश आहे. संविधानानुसार प्रत्येक जातीचे, धर्माचे लोक त्यांचे सणवार समान हक्काने साजरे करू शकतात.
भरतांमध्ये इंग्रज राज्य करू लागले तेव्हापासून ख्रिश्चन लोक गुड फ्रायडे साजरा करत आले आहेत. गुड फ्रायडे हा तसा येशू ख्रिस्ताला सुळावर चढवून धर्मा विरोधी वागला असे ठरवून ठार मारण्यात आले म्हणून शोक दिवस.
येशू ख्रिस्त यांनि त्यांची शिक्षा सहन करत असताना देखील परमेश्वराकडे प्रार्थना करत होते माझ्या या शत्रूंना माफ कर! त्यांच्या या बलिदानाची आठवण व त्यांच्या या मानवतेच्या शत्रुलाही माफ करण्याच्या वृत्तीला सलाम म्हणून या पवित्र शुक्रवारी येशूंसाठी प्रार्थना केली जाते.
इतिहास
येशू ख्रिस्त यांनी लोकांसाठी खूप कष्ट झेलले, त्याग आणि आत्मबलिदानही करावे लागले. म्हणून आज खिस्त धर्मीय बंधू भगिनी उपवास हि करतात. या दिवशी चर्च मध्ये मेणबत्ती पेटवत नाहीत, काही ठिकाणी काळे कपडे परिधान केले जातात व येशू ख्रिस्त यांच्या शिक्षेचा निषेध नोंदवतात. Paschal Triduum. गुड फ्राइडे पश्चल त्रिदूम का एक पार्ट आहे. काही चर्च मध्ये बीजारोपण केले जाते, काही ठिकाणी प्रार्थना करतात, काहीजण पुस्तक वाचन करतात व येशू ख्रिस्त यांच्या मानवतेच्या कार्यासाठी समर्पित करतात.
येशू ख्रिस्त यांचे देहावसान दुपारी 3 वाजण्याच्या आसपास गेले असल्या कारणाने लोक दुपारी तीन नंतर तीन तास प्रार्थना करत हा शोक दिन साजरा करतात. अवघा 5 टक्के दरम्यान असलेल्या ख्रिश्चन समाजाचा गुड फ्रायडे (१० एप्रिल २०२०) हा खर तर शोक दिन म्हणून ओळखला जातो
ख्रिश्चन धर्म संस्थापक येशूंचे आयुष्य ३३ वर्षांचे, व्यवसायाने सुतार !
दोन हजार वर्षांपूर्वी ‘शत्रूवरही प्रेम करा’ म्हणणारा, शांती आणि क्षमा सांगणारा उपदेशक, त्यांचे सोबत केवळ अकरा अनुयायी शिष्य असायचे, तेव्हा ज्यूंचे राज्य असल्याने समाजावर रोमनांची सत्ता होती. नाझरथ येथून जेरुसलेम या शंभर किलोमीटर अंतरावरील व्हलांडण धार्मिक सणासाठी प्रस्थान करत असताना येशूचे वाटेतील गावात प्रवचन होते, यावेळी येशूंनी गावात गाढवावर बसून सन्मानाने प्रवेश केला होता, ज्यूंचा संकेत असा होता की गाढवावरून बसून प्रवेश म्हणजे स्वतः ज्यूंचा राजा असल्याचे घोषित करणे, आणि येशूंनी आपक्या या कृतीने जणू ज्यू ना तसे सुचवले असे समजून ज्युनि त्यांना अपराधी ठरवले होते कर्मठ आणि सनातनी ज्यू धर्मगुरूंनी रोमन अधिकाऱ्याकडे तक्रार करून आणि दबावाने वधस्तंभावर, क्रुसावर चढवुन खिळे ठोकून मारण्याची शिक्षा द्यायला लावली. क्रुसावर जाताना येशू मात्र प्रार्थना करत होते – ‘परमेश्वरा, यांना क्षमा कर. हे काय करत आहेत हे त्यांना कळत नाही.’ तो दिवस शुक्रवारचा होता. येशूचे प्राण निर्वातल्यावर लोकांची पांगापांग झाल्यानंतर शिष्यांनी येशूचा मृतदेह कापडात गुंडाळून आईकडे नेला. छळाच्या भीतीने अनुयायी लपून राहिले. परंतु त्यांना विश्वास होता की येशू पुनः जन्म घेतील, आश्चर्य म्हणजे त्यानंतर तीनशे वर्षानंतर रोमन राजा कॉन्स्टँटिनोपल यांने ख्रिश्चन धर्मातील तत्त्वांचा स्वीकार केला. ख्रिश्चन धर्म प्रसारित होऊ लागला. क्रूस हेच त्याचे धर्मचिन्ह आणि बायबल हा धर्मग्रंथ झाला. आज जगातील सर्वाधिक अनुयायांचा धर्म म्हणून या धर्मास ओळखले जाते. प्रेम, शांती, क्षमा याचे प्रतीक असलेल्या, येशूला मनापासून अभिवादन !
ख्रिश्चनसमाज क्षमा प्रार्थना दिन:- 10 एप्रिल 2020 गुड फ्रायडे!
