पुणे (प्रतिनिधी तुकाराम पाटील)–लोकडाऊनमुळे सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे; सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना ना रामदास आठवले यांनी विजकंपन्यांना केली आहे. मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी ने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिके ने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.