भडगाव(संजय महाजन) येथून जवळच असलेल्या पिंप्री ता पाचोरा येथील शेतकऱ्याच्या शेतात लागलेल्या आगीत लाखो रुपये किमतीचा ऊस जाळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे 
पहिलेच शेतकऱ्यावर संकटमागून संकट येत आहेत त्यातच यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व सध्यासुरु असलेल्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे व एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही व दुसरीकडे आलेले पीक डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळात तेरावा महिना चा अनुभव येत आहे 
पिंप्री ता पाचोरा येथील शेतकरी राजेंद्र विठ्ठल पाटील यांचे शेत पिंप्री शिवारात गट नंबर २१९ हे सार्वे रस्त्यावर असून त्यांनी आपल्या शेतात उसाची लागवळ केली होती संपूर्ण दोन एकर  ऊसाच्या शेतात त्यांनी  ठिबक सिंचन व पाईप लाईन केली होती पीक हातातोंडाशी आलेले असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागली व संपूर्ण उसाचे पीक डोळ्यादेखत नष्ट झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल दोन लाख रुपयेहुन अधिकचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी राजेंद्र पाटील  यांच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते झालेले नुकसान पाहून त्यांनी आपल्या अश्रूंना ही वाट मोकळी करून दिली त्यामुळे उपस्थित नागरिकही भावुक झाल्याचे दिसून आले आगीचे तांडव प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते अनेक तास आगीच्या ज्वाला भळकत होत्या गावातील नागरिकांनी अथक प्रयत्न करून मोठया परिश्रमाने आगीला शांत केले मात्र तो पर्यंत सर्व ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता झालेल्या नुसानीचा त्वरित पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याल नुकसांन भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोरदार होत आहे