लोहारा ता. पाचोरा–प्रतिनिधी—
आज ग्रामपंचायत लोहारा यांचे कडून संपूर्ण गावामध्ये ट्रॅकटर द्वारे सोडियम हायड्रोक्लोरीक ची फवारणी करुन गाव निर्जंतुकरण करण्यात आले. या वेळी ग्रामविकास अधिकारी आर टी बैसाने, सरपंच पती संजय पाटील,उपसरपंच कैलास चौधरी , नमो फॉऊंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केयुर चौधरी, शेनफडू कोळी व ग्रामपंचायत सद्स्य, कर्मचारी वर्ग सोशल डिस्टन्सीग चे पालन करीत उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपापल्या घराजवळ ग्रामपंचायतीला सहकार्य करीत फवारणी करून घेतली. या पूर्वीही ग्रामपंचायतीने गावात रिक्षा फिरवून
कोरोना संदर्भात जनजागृती केली आहे. हातात हात न घेणे, एक दुसऱ्यात अंतर ठेवणे, अत्यावश्यक गरज असल्यासच घराबाहेर पडणे, वेळोवेळी २० सेकंद हात स्वच्छ धूणे, नाक तोंड चेहऱ्याला हात लावु नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, तोंडाला मास्क लावणे ई. माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून बाहेर गावावरून येणाऱ्यांची माहिती घेतली आहे. व त्यांना होम कॉरंटाइन, १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
ग्रामपंचायतीने कोरोना संदर्भात जनजागृती सोबत गाव निर्जंतुकीसाठी फवारणी मोहीम राबविल्याने ग्रामस्थांनी आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
फोटो—सोडियम हायड्रोक्लोरीक ची फवारणी गावांत स्वतः करतांना उपसरपंच कैलास चौधरी
लोहारा गावामध्ये ट्रॅकटर द्वारे सोडियम हायड्रोक्लोरीक ची फवारणी
