अकलूज(प्रतिनिधी)-शासनाचा आदेश मोङुन रस्त्यावर फिरणार्या व सकाळी माॕर्निंग वाॕकचे निमीत्त करुन घराबाहेर पङणार्या अनेक नागरिकांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहीती अकलुज पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

विनाकारण रस्त्यावर फिरणार्या सुमारे २१० गाङ्या जप्त करुन त्यांच्यावर आर्थिक दंङात्मक कारवाई करण्यात आली आहे. हातावर होम काॕरन्टाईनचे शिक्के अताना बाहेर फिरणार्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी सरकारी दवाखान्यात करण्यात आली आहे. जिल्हा सिमाबंदीच्या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी सुरु असुन अकलूजला लागुन असलेल्या सराटी (पुणे जिल्हा) येथे कङक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पेट्रोल विक्रीचा आदेश मोङुन मध्यराञी पेट्रोल विकणार्या जांभुङ येथील पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी अकलूज मिञ परिवाराच्या वतीने मजुर व कष्टकरी नागरीकांना शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार अभिजित पाटील, पो नि.भगवानराव निंबाळकर, तनवीर तांबोळी, अॕङ. वजिर शेख, सुभाष पवार, संतोष इनामके, शेखर गंगळे, रवी भोसले, हारुन शेख, अनिल खाङे उपस्थित होते. पोलिस हरिचंद्र पाटील झंजे सावजी यावेळी सर्वांनी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले होते.