भेंडा (प्रतिनीधी): प्रशासनाने अत्यावश्यक सेवेत किराणा दुकान चालू ठेवण्याचे आदेशानुसार परिसरातील किराणा ठोक विक्रेते हे भेंडा परिसरातील किरकोळ किराणा दुकानदार यांना मालाची टंचाई निर्माण करून मालक येत नाही हे कारण सांगून मोठ्या प्रमाणात चढ्या दराने माल विकून लूट सुरू केली आहे. त्यात शेंगदाणे, गोडेतेल आदी वस्तूचा समावेश आहे.
या ठोक किराणा व्यापार्यांकडून चढ्या दराने माल मिळत असल्याने नाविलाजाने किरकोळ दुकानदाराला त्याही पेक्षा अधिक जास्त प्रमाणात वस्तू व्हावी लागते आहे.
परिणामी ग्राहकाची नाराजी व्यक्त करून मोठा संताप व्यक्त केला आहे. परिणामी किरकोळ दुकानदाराला स्थानिक पातळीवर तोंड द्यावे लागत आहे.
शेंगदाणे १३०ते १४०गोडतेल शंभरी ओलांडली आहे. दर सप्यापटीने वाढून किरकोळ विक्री गरा,खोबरे,गुळ आदी वस्तूंची हे ठोक व्यापारी मालाची टंचाई निर्माण करून किरकोळ दुकानदारांनी भरमसाठ लूट करत आहे.किरकोळ दुकानदार व ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
