पालम (शांतीलाल शर्मा) परभणी
जिल्हाधिकारी कार्यालया च्या परिसरात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर,पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते उपक्रमाचा प्रारंभ.
लॉक डाऊन कालावधीत हॉटेल व्यवसाय पूर्ण पणे बंद असल्यामुळे रस्त्यावरील बेघर असलेल्या लोकांची भूक भागवण्यासाठी अनेक संस्था संघटनांनी एकत्र येऊन मोफत अन्नछत्र सेवेचा उपक्रम हाती घेतला.
रोज दोनशे लोकांना अन्न छत्र सेवेचा लाभ देण्यात येतो दोन पोळी,एक भाजी आणि भात असल्याचे सांगितले.
बेघारांना एक वेळचे छत्र हा उपक्रम चांगला असून या उपक्रम राबविणाऱ्या टीम चे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सोबतच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कौतुक केले.या प्रसंगी निवासी
उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उप जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे हे उपस्थित होते.