भुसावळ:-( प्रतिनिधी फिरोज खान)वडिलांच्या नावावर करून देण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्विकारतांना भुसावळ येथील रेशनदुकान जिल्हा पुरवठा शाखेतील दोघांसह दोन पंटरांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ येथील एका व्यक्तीने आजोबाचे रेशन दुकान त्यांच्या वडिलांच्या नावावर करण्याच्या मोबदल्यात जिल्हा पुरवठा शाखेतील अव्वल कारकून प्रमिला भानुदास नारखेडे(रा. मेथाजी प्लॉट, भुसावळ), अव्वल कारकून पुनम अशोक खैरनार(जळगाव), हमाल कंत्राटदार प्रकाश त्र्यंबक पाटील( रा.जाकीर हुसैन कॉलनी, जळगाव) तसेच गुजरात पेट्रोल पंप परिसरातील जैन मंदिर जवळील दुध डेअरी व्यावसायिक योगेश नंदलाल जाधव या चौघांनी तक्रारदाराकडे या कामासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार ठरल्याप्रमाणे आज दुपारी ४० हजार रुपयांची लाच स्विकारतांना वरील चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले व त्यांच्या विरुध्द रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे व अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील डी.वायएसपी जी.एम.ठाकूर, पीआय निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहा.पोलिस उपनिरिक्षक रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहिरे, सुरेश पाटील, सुनिल पाटील, पो.ना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना. जनार्दन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, नसिर देशमुख, पो.कॉ.महेश सोमवंशी, ईश्वर धनगर या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्हा पुरवठा विभागात तसेच तालुका पातळीवरील पुरवठा शाखांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुरवठा विभागातील दोन महिलांसह दोन पंटर लाच घेतांना अटकेत
