भडगाव -येथील माळी पंचमंडळ व महात्मा फुले बहुउद्देशीय सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन व प्रतिमापूजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी निंबा सोनू महाजन होते तर प्रतिमापूजन सुरेश रोकडे यांनी केले. याप्रसंगी भिकन सजन महाजन, दिनेश रघुनाथ पाटील ,संतोष बाबूलाल महाजन ,विनोद शिवराम महाजन ,गोविंद महाजन, आप्पा महाजन, विनोद बाजीराव महाजन ,राहुल सुरेश महाजन ,बाळू महाजन ,जीवन तुकाराम महाजन, शामकांत देविदास चौधरी, मुकेश साहेबराव महाजन, दत्तू अभिमन महाजन ,चेतन महाजन, मांगु महाजन ,उज्वल महाजन ,ॲड. आबा महाजन, यश महाजन, बापू महाजन गोरख महाजन, अशोक महाजन, संदीप बोरसे आदी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी प्रवीण महाजन ,सुरेश रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन
