जामनेर(प्रतिनिधी) :-दि ७ जामनेर तालुक्यात अतिपाऊस झाल्याने शेतकऱ्यांनच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी शासनाने जास्तीतजास्त व वेळेवर मदत करावी या व इतर मागण्यांसाठी जामनेर तालुका शिवसेना, युवासेनेच्या नेतृत्वाखाली जामनेरात आज दिनांक ७-११-२०१९ गुरुवार रोजी दुपारी एक वाजता क्रांतीसुर्य महाराणा प्रताप चौक येथून शासनाकडून त्वरीत शासकीय मदत मिळावी यासाठी घोषणांचे फलक घेत घोषणा देत जामनेर तहसील कार्यालया पर्यंत आला तहसील कार्यालयाच्या गेट वर मोर्चा पोलिसांनी अडवून फक्त ५ पदाधिकार्यना आत सोडण्यात आले या वेळी शेतकऱ्यांना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ मनोहर पाटील,सुकलाल बारी,सांडू मामा गुरव,युवा सेनेचे विश्वजित पाटील,भारत पवार,पवन माळी,रवी पांढरे,नीलकंठ पाटील यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत त्वरित मदत मिळण्याची मागणी केली या वेळी म्हातारी महिला शेतकरी हातात कोंब आलेले मका घेऊन आली होती जामनेर तहसीलदार यांना खालील शेतकऱ्यांनच्या मागण्यांचे निवेदन विषवजित पाटील यांनी दिले निवेदनात
प्रमुख मागण्या १)ओला दुष्काळ जाहीर करा (२) 20000 प्रतिएकर मदत करा (३)शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शंभर टक्के कर्ज मुक्त करा (४)विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा विद्यार्थ्यांना मोफत व एसटी पास द्या
(५) सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्या (६)संजय गांधी श्रावणबाळ योजना अंतर्गत आर्थिक वाढ करा (७)आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत द्या(८) रस्त्यांची कामे त्वरित करा (९)सुकलाल बारी वाघूर विकास आघाडी पहूर यांच्या संकल्पनेतील तापी नदी जोड प्रकल्प सुरू करा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले
शिवसेना,युवासेनेच्या वतीने शेतकरी मोर्चा
