कजगाव ता भडगाव जळगाव येथील पत्रकार हेमंत पाटील यांच्या वर जळगाव पीपल्स बँकचे च्या संचालक मंडळाने खोटा गुन्हा दाखल करून एक प्रकारे लोकशाहीच्या चौथा आधार स्थभाची गळचेपी केली त्यामुळे पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय ग्रामिन पत्रकार संघाच्या भडगाव तालुक्याच्या वतीने भडगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले
जळगाव येथील पत्रकार व दैनिक बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांनी जळगाव पीपल्स बँकेला भारतीय रिजर्व बँकेने पंचवीस लाख रुपये दंड केल्याच्या कारवाईची बातमी प्रकाशीत केली ह्या बातमीचा राग येऊन जळगाव पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाने पत्रकार हेमंत पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यामुळे हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नितीन सोनार जिल्हा कोषाध्यक्ष भानुदास महाजन विजय पाटील संजय महाजन संजय कोतकर प्रशांत पाटील किसन वराडे सुभाष पवार गुलाब नेरपगार निलेश महाले व असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तर पोलीस पोलीस दलाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव व पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे व यांनी निवेदन स्वीकारले