लोहारा(प्रतिनिधी) :– येथील काशिनाथ यशवंत राजपूत ( वय -६०) हे आज दि. १ नोव्हेंबर रोजी प्रातः विधी साठी रस्त्याने जात असतांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील सरकारी दवाखान्या जवळ वडाच्या झाडावर असलेल्या मधमाश्यानी पाठीमागून अचानक हल्ला करून चावा घेण्यास सुरुवात केली. लागलीच आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी काशिनाथ राजपूत यांच्या अंगावर ओले पोते,गोधडी टाकून बचाव केला मात्र मधमाश्यांच्या जोरदार हल्ल्यात काशिनाथ राजपूत हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी काशिनाथ राजपूत यांना पाचोरा येथील रुग्णालयात आणत असतांनाच रस्त्यात त्यांचा मुत्यु झाला.मयताचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत सायंकाळ पर्यंत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मयताच्या पश्चात दोन भाऊ ,पुतणे असा परिवार आहे.
लोहारा येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; संपूर्ण गावात हळहळ
