सातारा/ प्रतिनिधी–सचिन ठणके

फलटण:मुंजवडी ता.फलटण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाडगेवस्ती येथील नवीन शाळेच्या इमारतीचे काम श्री.सुरज राजेंद्र गोडसे यांनी सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अंदाजपञकीय रक्कम.8.16 लक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाडगेवस्ती एक खोली बांधकाम उत्कृष्टपणे काम पूर्ण केले आहे.घाडगेवस्ती येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सदस्य विश्वास दादा गावडे व मुंजवडी ओम खोलेश्वर पॅनलचे गटनेते कमलाकर ठणके गुरुजी सरपंच सौ. स्वातीताई कुंडलीक कदम, ग्रामसेवक विलास ढंगाणे,माजी उपसरपंच कुंडलिक कदम,माजी उपसरपंच सुभाष झेंडे ,सदस्य बापूराव ठणके,सदस्या उषाताई येडे,बुवा घाडगे, माजी तंटामुक्ती सचिन वाघमोडे ,मालोजी येडे, राजेंद्र साळूखे, कांता बापू कदम,पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन ठणके पाटील उद्योजक मधुकर रणदिवे यांनी सतत पाठपुरावा करून जिल्हा परिषद च्या माध्यमातून घाडगे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळा घाडगे वस्ती नवीन इमारती बांधकाम पूर्ण केले. यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी आभार मानलेले आहे.