मिरज/प्रतिनीधी-संजय पवार
सांगली येथील शे.र.वि. गो. सर्वोदय विद्यालयातील गरीब , हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना अवनी फाउंडेशन संस्थेमार्फत सायकली वाटप करण्यात आल्या. यावेळी अवनी फाऊंडेशनचे आनंदा लेंगरे म्हणाले आमच्या संस्थेमार्फत जे विद्यार्थी शाळेला लांबून येतात त्यांचा प्रवासातील वेळ कमी व्हावा,अध्यापनात चांगले लक्ष लागावे यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सायकली भेट देत असतो. आम्ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून ज्या विद्यार्थ्यांना सायकली घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांचा आम्ही शोध घेतो.आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अवनी फाउंडेशन च्या वतीने सायकली व इतर शैक्षणिक साहित्य देत असतो. या कार्यक्रमासाठी अवनी फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जाधव, सचिव कपिल वराळे, उपाध्यक्ष कपिल चव्हाण, आनंदा लेंगरे, सचिन शहा, विनोद कांबळे, अभिजीत तवटे तसेच सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव आनंदराव पाटील (काका) मुख्याध्यापिका मंदाकिनी सावंत, परशुराम रणधीर,सुधीर सोनार, संजय पवार, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कदम यांनी केले, प्रस्ताविक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अशोक वाघमोडे यांनी केले तर आभार सुधीर सोनार यांनी मांडले.
