गारखेडा/प्रतिनिधी-सुनिल चौधरी

गारखेडा ता.जामनेर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नारायण मोतीराम पाटील [वय ८६, ] दिनांक १३/१/२०२२ रोजी सकाळी २:४० वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी ,मुलगा ,दोन मुली,सून ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सुमारे चाळीस वर्षे त्यांनी गारखेडा ग्राम पंचायतचे अविरोध सरपंच पद भूषविले.ते जामनेरकर पंचायत समितीचे माजी सदस्य होते . तसेच जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही सेवाकार्य केले .पंचक्रोशीतील अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ते चिरपरिचित आहे.गारखेडा ता.जामनेर येथील डॉ .चंद्रकांत पाटील यांचे वडील आणि जामनेर येथील दंत चिकित्सक डॉ .स्वप्नील पाटील यांचे आजोबा होते

.