देऊळगाव /प्रतिनिधी-किरण जटाळे
देऊळगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शासन निर्णयानुसार आज पासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर दणाणून गेला होता.
संपूर्ण जगावर covid-19 च्या दहशतीचे राज्य असताना. तब्बल दोन वर्षापासून प्रत्यक्ष वर्गात अध्यापन बंद होते. ऑनलाईन अध्यापन तसेच गृहभेटी व पालक भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास देण्यात येत होता. आज दोन वर्षानंतर शाळेच्या प्रांगणात चिमुरड्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आपला वर्ग वर्गशिक्षक व मित्र यांना भेटून विद्यार्थी आनंदित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता 1ली चा वर्ग या वर्षांपासून सेमी इंग्लिश झाल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना आनंद झाला होता. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यात आले व विद्यार्थ्यांना स्यानिटायझर देण्यात आले. उपमुख्याध्यापक श्री सचिन जोशी सर व उपशिक्षक श्री संतोष राठोड सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व फुगे देत स्वागत केले. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी याबाबत मार्गदर्शन केले. संपूर्ण परिसर शाळेचा सुशोभित करण्यात आला होता परिसर सुशोभन ना साठी उपशिक्षिका सौ. विद्या जोशी मॅडम व श्रीमती मीनल महाजन मॅडम यांनी परिश्रम घेतले होते . इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना नवोदय संदर्भात श्री जयवर्धन लोखंडे सर यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे देखील मार्गदर्शन या प्रसंगी लाभले..
