तालुका अध्यक्ष पदी दिपक उंबरकर यांची नियुक्ती
जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटना परिचारकांची सभा जिल्हाध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे दि.14/11/21 रोजी संपन्न करण्यात आली.                      या सभेत भविष्यात संगणक परिचालक यांना ग्रामपंचायत मध्ये काम करित असतांना येनार्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना सदैव त्यांच्या पाठिशी उभी असेल अशी ग्वाही तालुका अध्यक्ष दिपक उंबरकर यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघणक परिचालक संघटनेची नुतन तालुका कार्यकारिणी जाहीर करून
दिपक उंबरकर यांची तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे. तर नारायण सोनवणे,व प्रभाकर पाटील तालुका उपाध्यक्ष, दिपक माळी  सचिव तर ज्ञानेश्वर बाविस्कर सहसचिव,गणेश गोसावी कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. 
याठिकाणी जळगाव जिल्ह्याचे सचिव जितेंद्र माळी,व तालुक्यातील संगणक परिचालक,आदी पदाधिकारी उपस्थित होते.