.

जामनेर/ उपसंपादक-शांताराम झाल्टे गुरुदेव सेवा आश्रम येथे श्री.श्याम चैतन्यजी महाराज यांच्या आश्रमात भेट देऊन जळगाव जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक श्री. N.S. चव्हाण यांनी वृंदावन धाम पाल येथे परमपूज्य ब्र संत श्री लक्ष्मण चैतन्य जी समाधी चे पावन दर्शन करून, श्रध्देय संत श्री. गोपाल चैतन्य जी बाबा यांचे आशीर्वाद घेतले व निसर्गरम्य सान्निध्यात अध्यात्मिक आनंदाचा आस्वाद घेतला, यावेळी श्रद्धेय श्री. श्याम चैतन्यजी महाराज यांनी संपूर्ण परिसराची माहिती श्री. N.S. चव्हाण यांना दिली आणि त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात फैजपूरला परमपूज्य महामंडलेश्वर श्री. जनार्दन हरीजी महाराज यांच्या ही आश्रमाला भेट देऊन संत वचनाचा लाभ श्री. N.S. चव्हाण यांनी घेतला यावेळी “विज्ञान आणि अध्यात्म यांच्या सानिध्यात विचारांचे शुद्धीकरण होते असे प्रतिपादन श्री. N.S. चव्हाण यांनी केले!या अध्यात्मिक प्रसंगी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उषाताई चव्हाण या सुद्धा उपस्थित होत्या.