पहूर येथे पत्रकार गुण गौरव सोहळा संपन्न जामनेेर/शांताराम झाल्टे
जामनेर (दि . ११) पिढ्यानपिढ्या चालणारा संस्कारांचा वारसा संजय दादा गरुड यांनी चालू ठेवला असे गौरवोद्गार पहूर येथील ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांनी काढले . पत्रकार गौरव सप्ताह निमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते .
समाजातील अज्ञान अंधकार दूर करून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवा करणारे पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहेत .त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संजय दादा गरुड आणि प्रदीप लोढा यांनी पहूर येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेच्या सभागृहात पहूर येथील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार केला .याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना शांताराम लाठे यांनी सांगितले की स्वर्गीय नानासाहेब गरुड सर , नामदेवांना गरुड , कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या दातृत्वाचा वसा आणि वारसा संजय दादा गरुड चालवत आहेत . आचार्य गजाननराव गरुड यांनी स्वाभिमानी राजकारण करून राज्यात नावलौकिक मिळवला . याप्रसंगी संजय दादा गरुड प्रदीप लोढा यांनी मार्गदर्शन केले .संस्थेचे अध्यक्ष बाबुराव पांढरी व संचालक मंडळ कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते .सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष शैलेश पाटील यांनी केले .आभार प्रदर्शन उपसरपंच श्याम सावळे यांनी केले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुचवल्या वर देखील मनाचा मोठेपणा दाखवत संजय दादा गरुड यांनी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांचे नाव सुचवले याने खऱ्या अर्थाने पत्रकारांचा गौरव झाला .
यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घोलप ,उपाध्यक्ष किरण जाधव , सचिव शंकर भामेरे , सादिक शेख , शरद बेलपत्रे , गणेश पांढरे , मनोज जोशी , जयंत जोशी त्यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते .
पहुर शिवसेना शहर शाखेतर्फे शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव संजय तायडे रमेश शिरसागर युवासेना उपतालुका आमीन शेख आदी मान्यवरांनी सर्व पत्रकांचा सत्कार केला
तसेच पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार बांधवांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी देखील अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे हे होते .त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीसाठी ज्या दानशूर व्यक्तींनी जागा दिली त्या स्वर्गीय गोल्हारे यांचा पुतळा ग्रामपंचायत आवारात व्हावा .त्यांच्या या प्रस्तावाला अनुमोदन देत माजी सरपंच लक्ष्मण गोरे यांनी लवकरच ग्रामपंचायतीच्या आवारात स्वर्गीय गोल्हारे यांचा पुतळा उभारला जाईल असे सांगीतले . याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव अण्णा घोंगडे यांच्या कार्याचा उल्लेख करत कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतारामबापू यांनी सांगितले की पत्रकारांच्या सूचनेचा वेळोवेळी पाठपुरावा करून बाबुराव अण्णा घोंगडे यांनी स्मशानभूमी मार्गावरील दिवाबत्तीची सोय केली . पत्रकारांच्या सूचनांची दखल घेत विविध विकास कामे केली आहेत असेही श्री शांताराम बापू लाठे यांनी सांगितले . यावेळी माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे , सरपंच पती शंकर जाधव , अॅड . एस . आर . पाटील , उप सरपंच राजू जाधव , ग्रामपंचायत सदस्य योगेश भडांगे , दिनकर पवार , सुभाष धनगर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले . आभार सरपंच पती शंकर जाधव यांनी मानले .
