सांगली जिल्हा/ प्रतिनिधी -अशोक मासाळ.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वतीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू – भगिनिंना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे.पेन्शन हक्कापासून वंचित ठेवणारा 31 ऑक्टोबर 2005 चा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे.या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने रविवारी 31 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन केले सांगली जिल्हाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (विजयनगर) समोर दु.1.30 वा.धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी मा.राजेंद्र नागरगोजे पुणे विभाग अध्यक्ष.श्री बजरंग शिंदे सर,बाळासाहेब कणके सर,श्री विजयकुमार माने,बाळासाहेब चोपडे सर,रमेश कोष्टी सर,ए टी पाटील सर,तानाजी नरळे सर,
प्राथमिक चे बाळासाहेब कटारे प्रा.सुजाता कुलकर्णी,श्रीमती कमल चव्हाण,काटकर सर,व्हनखंडे सर मा.शंकर हणमापूरे सर, मा. श्री. सागर तावरे सर ए .वाय पाटील,श्रीशैल चिरमे, उपस्थित होते.
आजच्या आंदोलनास बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ ने पाठिंबा दिला होता यावेळी महासंघ चे पुणे विभागीय अध्यक्ष मा विजयकुमार कांबळे, सांगली जिल्हा संघटक सोपान भोसले उपस्थित होते.
शिक्षण हित शिक्षक हित व राष्ट्रहित यासाठी शिक्षक परिषद!
आपले विनीत_
मा.आ.भगवानराव आप्पा साळुंखे .मा.राजेंद्र नागरगोजे पुणे विभाग अध्यक्ष.
मा.बाळासाहेब कटारे सर
सांगली जिल्हाध्यक्ष प्राथमिक सर्व तालुका व महानगर पालिका आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य.