जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे
मा.कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक ९ येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा व लाडू तुलना मोठ्या उत्साहात संपन्न. सिद्धेश्वर गणपती मंदिर, एम.आय.डीसी कॉलनी येथे मा. प्रा.चंद्रकांत भाऊ धनवडे यांनी मा.आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लाडू तुलेचे आयोजन केले होते. सदर लाडू तुलेतील लाडू दिवाळी निमित्त प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व नागरीकांना गोड भेट म्हणून घरपोच पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते मा.आमदार साहेबांचा सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील पप्पु राजपुत,गणेश पाटील,नंदू पाटील, दिलीप कासार, रवी पाटील, सपणेश बाहेती, प्रवीण पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, सचिन पाटील, समाधान पाटील, किशोर परदेशी, प्रशांत पांढरे, गणेश परदेशी, दत्तू पाटील यांचेसह अनेकांचे सहकार्य लाभले.
शिवसेना पक्षाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य लाडू तुलना कार्यक्रम संपन्न
