मिरज /प्रतिनिधी -अशोक मासाळ
सांगली जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना व आटपाडी तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना पदाधिकारी निवड व सहविचार सभा कार्यक्रम ग .दि . माडगुळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज माडगुळे या ठिकाणी संपन्न झाला . या मध्ये आटपाडी तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी कर०यात आल्या या मध्ये आटपाडी तालुका अध्यक्ष पदी श्री . जी .एस. शिंदे सर यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री . अशोक पाटील सर यांची निवड करण्यात आली .
संघटनेच्या झालेल्या बैठकीत आटपाडी तालुका माजी अध्यक्ष अशोक पाटील याची ग़ . दि . माडगुळे हाय . ज्युनिअर कॉलेज प्रार्चय पदी निवड झाले बददल संघटनेच्या वतिने त्याचा सत्कार करण्यात आला . तसेच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्याची निवड बैठकीत करण्यात आली . तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे . श्री .जी.एस. शिंदे क्रीडा समन्वयक तथा तालुका अध्यक्ष आटपाडी . श्री .टी. एन . जाधव सर सचिव . श्री .के. एन . घरडे खजिनदार . श्री .एस. एस . गायकवाड व बी .ए. साळु खे याची आटपाडी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणुण जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी म्हणुन निवड करण्यात आली . या कार्यक्रमाला सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री जनार्दन झेंडे सर, सांगली जिल्हा शिक्षक भारती अध्यक्ष श्री सुधाकर माने (जिल्हा खजिनदार ) ‘ टीडीएफ संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष ,सर, कवठेमहांकाळ तालुका क्रीडा समन्वयक व शौर्य पुस्तकाचे लेखक श्री परशुराम लोंढे सह सचिव सर, तासगाव तालुका क्रीडा समन्वयक शहाजी खरमाटे सर, माण तालुका काँग्रेस आय तालुकाध्यक्ष व यशवंतराव चव्हाण हायस्कूल वरकुटे-मलवडी चे क्रीडा शिक्षक संजय जगताप सर ‘ रामचद्र पांगम बी .के. माने . कडेगाव , शेख सर जत उदय गायकवाड वाळवा , यशवंत चव्हाण विटा . सचिन हरोले .रुकसाना मुलानी इत्यादी मान्यवर व आटपाडी तालुक्या तील सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते .सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांच्या अडचणीवर चर्चा केली व शिक्षकाच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही दिली.
आटपाडी तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिघंची हायस्कूल दिघंची चे क्रीडाशिक्षक श्री . प्रदीप देशमुख सर यांनी केले व सूत्रसंचालन दिघंची हायस्कूल दिघंची चे क्रीडा शिक्षक श्री एस . एस . गायकवाड सर यांनी केले व अनुमोदन एकता मोरे-पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज दिघंची चे क्रीडा शिक्षक अमोल वसेकर यांनी केले.