सांगली/प्रतिनिधी -अशोक मासाळ
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील पगारदार संस्था सोसायट्या पतसंस्था गटामधून सात उमेदवार देऊन मध्यवर्ती बँकेत पॅनल उभा करणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी सांगितले सांगली जिल्हा शिक्षण सेवक सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पगारदार पतसंस्था ओबीसी एससी महिला राखीव प्रक्रिया संस्था ग्रामीण पतसंस्था विकास सोसायट्या या प्रवर्गातून आपले उमेदवार उभे करण्याचेकरण्याचे निश्चित केल्याची माहिती देण्यात आली पगार दर सोसायटी व पतसंस्थांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत मोठी उलाढाल होत असून ही संस्थांना प्रतिनिधित्व मात्र दिले जात नाही ही खंत यावेळी बोलून दाखवण्यात आली प्रतिवर्षी पगार पोटी 1000 कोटीची आर्थिक उलाढाल तसेच पगारदार सोसायटी व पतसंस्था यांच्या माध्यमातून होत असते शिवाय पगारदार संस्थेच्या ठेवी कायम ठेव गंगाजळी या माध्यमातून पाचशे कोटी पेक्षा जास्त व्यवहार होत असतो याशिवाय कॅश क्रेडीट च्या माध्यमातून आर्थिक विवाह होतो पण पगार संस्थेच्या प्रतिनिधी मात्र जिल्हा बँकेत नसल्याचे खंत व्यक्त करण्यात आलापगारदार संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे किमान सात जागा लढवण्याचे निश्चित केले ग्रामीण पतसंस्था प्रक्रिया संस्था गट विकास सोसायटी गट एससी ओबीसी महिला राखीव या गटातून आपले उमेदवार निश्चित केले आहेत पगारदार पतसंस्था हा मध्यवर्ती बँकेचा मजबूत कणा असून देखील आजपर्यंत जिल्हा बँकेच्या इतिहासात पगारदार संस्थेच्या प्रतिनिधी घेतला गेला नाही शेतकऱ्यांच्या सोसायटी व्यापार पतपेढ्या नागरी पतपेढी या यांना मोठा हातभार लावण्याचे काम पगार संस्थेकडून होत असतो आणि त्यामुळेच आपले संचालक बँकेत असावेत. यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे राजेंद्र नागरगोजे यांनी सांगितले तसेच शिक्षकांचा संबंध गावातील विविध सोसायटीच्या विविध संस्थांची अगदी जवळीक तिने संबंध येत असतो शिक्षकांना योग्य ठिकाणी नेतृत्व मिळाल्यास शिक्षकांच्या अनेक प्रश्न सोडविण्यास मदत होईल हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आज ही मिटिंग घेण्यात आली होती.
यावेळी या मीटिंगसाठी उपस्थित शि वाय जाधव अजित चव्हाण धनपाल यादव सुभाष यादव अरुण खरमाटे अमृत पांढरे जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ खरमाटे वहिनी व अन्य पतसंस्थेचे पदाधिकारी तसेच सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सोसायटीचे चेअरमन संजय पाटील यांनी ही या मिटींगमध्ये मदत करण्याचे जाहीर केला आहे. व शेवटी त्यांनीच आभार मानले व मिटींग समाप्त झाली.