केकतनिंभोरे:- येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच नमन फाउंडेशन चे अध्यक्ष दशरथ पाटील यांचा दि 10 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता तालुक्यात वाढदिवस व केक ही संकल्पना ज्यांनी संपुष्टात आणली व आज 11ऑक्टोबर रोजी शाळा उघडल्यावर पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्याची इच्छा प्रकट केली , वाढदिवस म्हणजे शाल ,श्रीफळ , पुष्पहार व केक ही अशी संकल्पना मोडीत काढून वाढदिवस म्हणजे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप व आरो मशीन फाउंडेशन मार्फत भेट देऊन नवीन उपक्रम राबविण्यात आला
◆सर्वप्रथम केकतनिंभोरे येथील प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत नमन फाउंडेशन चे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नवोदय विद्यालय मार्फत परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेत पास झाल्याबद्दल तनुश्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी मुख्याध्यापक भिरुड मॅडम , शिक्षण शालेय समिती अध्यक्ष अभय हिवरे ,सौ आशा पालवे मॅडम ,सौ प्रतिभा चौधरी मॅडम , सौ प्रतिमा चौधरी मॅडम ,सौ सविता पाटील मॅडम सौ हर्षा सूर्यवंशी मॅडम व शिक्षक व विद्यार्थी गण उपस्थित होते
■ त्यानंतर हिवरखेडा येथील जि प प्राथमिक शाळेत ही वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप केले
यावेळी मुख्याध्यापक सौ मीराबाई मोरे मॅडम व शिक्षण शालेय समिती अध्यक्ष वसंत महाजन व हिवरखेडा येथील देशदूत पत्रकार बाळू पाटील ,अरुण पाटील सर ,साठे सर ,सौ पुष्पा पाटील मॅडम , सौ हर्षा पाटील मॅडम , श्रीमती दुर्गा मॅडम उपस्थित होते
■त्यानंतर खादगावं येथील जि प प्राथमिक शाळेत नमन फाउंडेशन चे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरो मशीन भेट देण्यात आले तसेच वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी जामनेर यांची कन्या जि प शाळेत शिकत असल्याचे व नवोदय परीक्षेत यश संपादन झाल्याबद्दल नमन फाउंडेशन तर्फे कौतुक व अभिनंदन करण्यात आले यावेळी रामलाल चिंचोले गुरुजी ,भगवान ढेकाळे ,अशोक चौधरी ,भगवान शिंदे ,
मुख्याध्यापक सुनील कोंघे सर , , शिक्षण शालेय समिती अध्यक्ष बाळू चौधरी , शरद वासकर सर ,संजीव सपकाळ सर ,सौ रत्नप्रभा गोरे मॅडम ,माया शेळके मॅडम ,सुभाष माळी सर ,शेखर महाजन सर , विशाल लॉन्स चे संचालक डी यन चौधरी ,
कार्यक्रमाला उपस्थित होते
त्याच प्रमाणे ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे प्रयोजन आखण्यात आले होते असे नमन फाउंडेशन चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील , उपाध्यक्ष मयूर पाटील , सचिव योगेश पाटील , खजिनदार भूषण कांनळजे , संचालक अशोक पाटील , राहुल रॉय मुळे , जितेंद्र गवळी , कपिल पाटील , श्रीराम पाटील ,स्वप्नील श्रीखंडे ,अंकुश पंडित , राकेश देवकर , भगवान शिंदे , आदी उपस्थित होते
नमन फौंडेशन चे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केकतनिंभोरे , हिवरखेडा बु , खादगाव जि प शाळेत वृक्षारोपण शैक्षणिक साहित्य व आरो मशीन वाटप
