सांगली जिल्हा,मिरज/ प्रतिनिधी- अशोक मासाळ
दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज ही संस्था बहुजन समाजातील मुलांचे शिक्षण उत्कृष्टपणे करणारी शिक्षण संस्था 1921 मध्ये महादेव कृष्णा जाधव व गोविंद कृष्ण जाधव या शिक्षण प्रेमी बंधूनी स्थापना केली. गेल्या शंभर वर्षात या संस्थेने बहुजन समाजातील हजारो लोकांना भाकरी नोकरी उद्योग व्यवसायाचे सामर्थ्य दिले अनेक प्रगतिशील शेतकरी असंख्य शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनीयर घडविले. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या सेवेचे वृत्त खांद्यावरती घेऊन ग्रामीण व शहरी भागात शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन मुलांच्यासाठी विविध ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या मिरज, नरवाड ,गणेश वाडी, कवठे एकंद ,सोनी या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या.
आज दिनांक 11- 10- 2021रोजी कै. राजाराम महादेव जाधव यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सोनी या विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोनी गावचे सुपुत्र माजी मुख्याध्यापक श्री कुंभार गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या वकृत्व स्पर्धा लहान गट व मोठा गटात घेण्यात आल्या होत्या. या वक्तृत्व स्पर्धेत विजय प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून बक्षिसे प्राप्त झाली होती. या स्पर्धेत मोठा गट व लहान गट प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले——-
१ लहान गट वकृत्व
१) कु. समृद्धी नाना गोखले—प्रथम
२))कु. दामिनी चंद्रकांत बनसोडे द्वितीय
३)कु. अविनाश राजाराम पाटील तृतीय
४) पृथ्वीराज परशुराम नरुटे उत्तेजनार्थ
२) मोठा गट वकृत्व
१) अथर्व प्रमोद चव्हाण प्रथम
२) अल्फिया गौस मुजावर द्वितीय
३) दुर्गा अनिल शिंदे तृतीय
४) अतिम अकबर येलूरकर उत्तेजनार्थ
वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.