चोरांचा अंगणवाडी येथे चोरी करण्यात दुसर्यांदा प्रयत्न असल्याने नागरिक परेशान

देऊळगाव/प्रतिनिधी-किरण जटाळे तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे असलेल्या अंगणवाडीमध्ये नेहमीप्रमाणे उपलब्ध झालेले धान्य अंगणवाडीच्या हॉल मध्ये ठेवण्यात आले होते . आज दिनांक 9 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंगणवाडी सेविका अंगणवाडीत आल्या असतांना त्यांना अंगणवाडीतील हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचा प्रकार डोळ्यासमोर उघडकिस आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब ग्रामपंचायत सरपंच कर्मचारी व इतर गावातील नागरिक यांना सांगून तो प्रकार सर्वांनी पाहिला असता चोरट्यांनी गहू, चना डाळ, व साखर अशा मौल्यवान वस्तू अंगणवाडीच्या हॉल मधून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या अगोदर सुद्धा एकदा असाच प्रकार अंगणवाडीमध्ये घडलेला आहे यासंदर्भात अंगणवाडीच्या सेविकांनी घडलेला सर्व प्रकार वरिष्ठांकडे सांगून फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आले असूूून पुढील तपास चालू आहे.