जामनेर(उपसंपादक)शांताराम झाल्टे
जामनेेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ शिवशक्ती ढाबा ठिकाणी पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पेट्रोलिंग ला जात असताना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना जळगाव हुन संभाजीनगर कडे तीन ट्रक त्यात गीर जातीच्या गाई असलेले त्यांना आढळून आले या सर्व गाड्यांमध्ये एकूण 42 गाई निदर्शनात आले असून त्यांची एकूण किंमत सात लाख रुपये किमतीच्या असून या सर्व गाई राजस्थान ना मधून येतहोत्या संभाजीनगर येथे कत्तलखान्या साठी जात असल्यास प्राथमिक स्वरूपाचा अंदाज व करण्यात येत आहे या ट्रक चालक आशी विचारले असता त्यांनी एक ट्रक वडोद बाजार याठिकाणी तर दोन ट्रक जालना येथे डेअरी साठी जात असल्याचे सांगितले या ट्रकमध्ये एकूण चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यात दिनेश वैष्णव राजू गुजर सुरेश भाबी अन्य एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पहूर पोलिस ठाण्यात तिनी ट्रक जप्त करण्यात आले आहे सर्व गाई गोशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे संबंधित ट्रकचालकाचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याप्रकरणी पवर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे तपास करीत आहे