जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती करण्यात आली. याठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानगंगा विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे.उपशिक्षक विजय कोळी,विनय खोंडे,व्ही. एन.पाटील,योगेश बावस्कर, अनिल देशमुख,रूपेश क्षिरसागर, भारंबे,स्नेहल पाटील,रोहिणी पाटील तसेच शालेय कर्मचारी उपस्थित होते.