कोल्हापूर( प्रतिनिधी गोरख कांबळे)सध्या देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना रोगाने थैमान घातले आहे.त्यामुळे बऱ्याच लोकांना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच जे लोक बाहेरगावी कामानिमित्त गेलेले आहेत. ते त्याच ठिकाणी स्थलांतरित आहेत तसेच दररोजचे हातावरचे पोट असणारे लोक यांनाही दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडत आहे.अशा गरजू व निराधार लोकांसाठी कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले, सांगली व आसपासच्या परीसरातील नागरिकांना संजय घोडावत फौंडेशननेकडून विनामूल्य घरपोच जेवणाची सोय केली जाणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या लाँकडाऊन व संचारबंदी परिस्थितीमुळे अनेक बेघर परप्रांतीय प्रवासी हातावरचे पोट असणारे व दैनंदिन बाजार भरू न शकणारे, दिव्यांग किंवा निराधार लोकांची माहिती संजय घोडावत फाउंडेशने मागितली आहे.
अशा लोकांची माहिती कळविल्यास त्यांना संजय घोडावत फाउंडेशन कडून विनामूल्य घरपोच जेवणाची व्यवस्था होईल.तरी अशा गरजू लोकांनी खालील नंबरशी संपर्क साधावा.व आपल्या परीसरातील गरजू व निराधार लोकांची माहिती उपलब्ध करून द्यावी. यामध्ये कोल्हापूर सेंटरसाठी-१) सागर माळवे.फोन नंबर–86 00 66 88 22 व 2)रवींद्र कुल्लूर.फो.नं– 77 75 0 6 85 55 तसेच इंचलकरंजी व हातकणंगले सेंटरसाठी–१)सतिश परांजपे.फोन नंबर– 91 72 29 94 11. व २)उमेश पाटील. फोन नंबर– 74 100 88 718. या लोकांना संपर्क करून आपल्या परिसरामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये जे गरजू व उपाशीपोटी आहेत.या लोकांची माहिती संजय घोडावत फाउंडेशन यांना या सेंटरच्या माध्यमातून कळवावी. असे आवाहन संजय घोडावत फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.
संजय घोडावत फौंडेशन कडून गरजू व निराधार लोकांना मदतीचा हात
