कोल्हापूर (प्रतिनिधी गोरख कांबळे) कागल येथील सेवानिवृत्त आयटीआय शिक्षक बाळासाहेब शंकर पाटील (सरवडे )यांचे तीन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या स्मृती जोपासण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती सुषमा बाळासाहेब पाटील यांनी देशामध्ये व राज्यांमध्ये कोरोना रोगाने थैमान घातले आहे. अशा लाँकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा या संकटात सापडलेल्या शहरातील एकूण 30 निराधार कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य देण्याचे ठरविले. व यामध्ये त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पतींच्या स्मृती जोपासण्याचा एक सामाजिक प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले.
या सामाजिक उपक्रमातून त्यांनी एकूण 30 निराधार कुटुंबांना मदत केली आहे.यामध्ये श्रीमती सुषमा बाळासाहेब पाटील व हिंदुराव शंकर पाटील (सरवडे) कॉ.अशोक चौगुले यांनी त्या तीस कुटुंबांना गहू, तांदूळ,तुरडाळ,मुगडाळ, खाद्यतेल ,साखर ,निरमा साबण असे एकूण 15000 हजार रुपयाचे संसार उपयोगी साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यावेळी या निराधारांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून पाटील कुटुंब गहिवरून गेले.यावेळी खरोखरच पतीच्या स्मृती जोपासण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. संकट काळामध्ये या कुटुंबांच्या सुख दुःखा मध्ये सामील होण्याचा श्रीमती सुषमा पाटील यांचा कृतिशील उपक्रम समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमातून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण झाला आहे.
निराधार कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य देऊन जोपासल्या पतीच्या स्मृती
