भडगाव(प्रतिनिधी संजय महाजन) सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे भारतासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे जनजीवन ही विस्कळीत झाले आहे त्यातच वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता काही डॉक्टरांनी ही सेवा देण्यात आखडता हात ठेवला त्यामुळे काहीबाबतीत डॉक्टरांवर विविध स्थरावरून नाराजी व्यक्त होत आहे मात्र कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत पाटील यांनी सर्व मर्यादांना फाटा देत आपली वैद्यकीय सेवा कायम ठेवली आहे त्यांनी आपल्या प्रत्येक रुग्णांना वयक्तिक स्वतः तपासणी करीत आहेत सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी साधारण नेहमीप्रमाणे ८०ते१०० रुग्णांची तपासणी केली जात आहे सध्या सर्दी खोकला पासून ते विविध आजारी रुग्णांची तपासणी करीत आहेत तर मुंबई पुणे व इतर शहरातुन कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या च्या कार्यक्षेत्रातील गावात आलेल्या तब्बल २२००पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी प्रा आ केंद्रा मार्फत करण्यात आली आहे व गावातील प्रत्येक भागात आशा सेविकांमार्फत ते तपासणी करीत आहेत त्यांना सहाय्यक डॉक्टर परिचारिका आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक आशा गट प्रवर्तक अशासेविका अंगणवाडी सेविका व कर्मचारीचे सहकार्य लाभत आहे आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना कोरोना विषयी विविध सूचना देण्यात येत आहे व ठिकठिकाणी जनजागृती मोहीम ही राबवण्यात येत आहे गेल्या वर्षभरापासून पासून डॉ प्रशांत पाटील हे कजगाव प्रा आ केंद्रामध्ये सेवा देत आहेत त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थांना ते सुपरिचित आहेत सध्याच्या कोरोना विषाणूच्या परिस्थितीत ही आपली सेवा २४ तास कायम पूर्ववत ठेवणाऱ्या डॉ पाटील यांचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे त्यांच्या सारखीच इतर सर्व डॉक्टरांनी ही जनसामान्य नागरिकांना सेवा पुरवावी असा सूर जनसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे
प्रतिक्रिया
सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घालते आहे लोक डॉक्टरांकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत रुग्णांना सेवा देण्याचे भाग्य आम्हा डॉक्टरांना चालून आले आहे संधी समजून आम्ही प्रत्येकाला सेवा देत आहोत त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही महत्वाचे आहे शासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात यावे म्हणजे कोरोनाची निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात यश येईल वैद्यकीय सेवा सर्वच बाजूने जनतेला देण्यात येत आहे आम्ही सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी जनतेला सेवादेण्यास कटिबद्ध आहोत कोरोनाच्या पाश्वभूमीवर जवळपास सर्वच खाजगी व सरकारी डॉक्टर उत्तमपणे काम करीत आहेत व सर्वच खाजगी डॉक्टरांनीही आपल्या जवळ आलेल्या रुग्णांना सेवा द्यावी त्यामुळे सेवा देत असल्याचा प्रत्येक डॉक्टरांना अभिमान वाटेल अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पाटील यांनी पुण्यनगरीशी बोलताना दिली
