कोल्हापूर प्रतिनिधी:- प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन, सामाजिक अंतराचे निकष पाळून परीक्षा कशा घ्याव्यात, परीक्षा, निकाल लांबल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांवर होणारा परिणाम कसा टाळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक समिती नेमली होती.
समितीमध्ये ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा अथवा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका अशा स्वरूपात परीक्षा घेणे विषयी चर्चा झाली. केंद्र शासन सूचनेनुसार शैक्षणिक वेळापत्रक, परीक्षा यांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेही समिती नेमली आहे.
राज्याच्या समितीने आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशांपर्यंत निर्णय न घेण्याचे निश्चित केले आहे.
यामुळे राज्यातील विद्यापीठातील परीक्षांचे नियमन आता यूजीसीच्या अहवालावर अवलंबून