कोल्हापूर (प्रतिनिधी संजय पाटील):-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्रांच्या वितरणा वरील निर्बंध त्वरित मागे घ्यावेत. केंद्र सरकारने मुद्रित माध्यमांना छपाई आणि वितरणास अत्यावश्यक सेवा म्हणून सवलत दिली आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्रातून कोरोणाचा संसर्ग होत नसल्याचे जाहीर केले आहे. तथापि राज्य सरकारने २०एप्रिल २०२०पासून मुद्रित माध्यमांना लॉक डाऊन सूट दिली आहे व वृत्तपत्र आणि मासिकांचे घरोघरी वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.वृत्तपत्रांचे वितरण हे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून करण्यात येत आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय कमी आहे म्हणजेच ऑरेंज व ग्रीन झोन मधील जिल्ह्यात वितरणासाठी निर्बंध हटविण्यात यावेत .जनतेला त्यांच्या जीवनाशी निगडित दैनंदिन बातम्यांची माहिती देणारी वृत्तपत्रे हे विश्वासार्ह माध्यम आहे सदर निर्बंधांमुळे संपूर्ण मुद्रित माध्यम उद्योगाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसायाला दिलासा देण्यासाठी वितरणा वरील निर्बंध त्वरित मागे घ्यावे अशी मागणी प्रा अरविंद जैनापुरे.

जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस सांगली यांनी केली आहे.