भडगाव(संजय महाजन) येथिल प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया मार्फत राजस्थान राज्यातील माउंट आबु येथे कजगाव बहाळ गोंडगाव खाजोळा घुसर्डी व परिसरातील २७ नागरीक हे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते मात्र संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर लावलेल्या संचारबंदी कायद्यामुळे कजगाव परिसरातील २७नागरीक अडकून पडलेले आहेत त्यामुळे संबंधीत धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले नागरीक हे आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने प्रचंड व्यथित झाले आहेत तर अनेक नागरीक हे आपल्या परिवाराविषयी चिंतेत आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा आपल्या गावात आणावे अशी मागणी होत आहेत याबाबत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी संगितले की माउंट आबु येथे अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्राशी संपर्क केला असून लवकरच त्यांना स्वगृही आणण्यासाठीचे  प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी संगितले त्यामुळे अडकलेल्या नागरिक लवकरच आपल्या स्वगृही येतील अशी आशा व्यक्त होत आहे व प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे