कोल्हापूर( प्रतिनिधी संजय पाटील):-सध्या कोरोना साथीने जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. आपल्या संस्थेचे सर्व सभासद लाॅकडाऊनमुळे घरीच आहेत. यापुढे कोरोना साथीची अवस्था काय असणार हे आजघडीला सांगता येत नाही.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सर्वसामान्य जनतेला अडचण येऊ नये म्हणून यापुढील तीन कर्जाचे हप्ते वसूली थांबवून कर्जावरील व्याज माफ करणेबाबत सूचना सर्व बँका व वित्तीय संस्थाना दिले आहेत.
आपल्या संस्थेच्या बहुतांश कर्जदार सभासदांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही
, शिवाय अनेक शिक्षक सभासदांच्या हातात जेमतेम रक्कम पगारातून मिळते, बहुतेक शिक्षकेतर सेवकांची तर आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. सध्याच्या कोरोना साथीने सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यातून सावरण्यासाठी आपल्या संस्थेच्या कर्जदार सभासदांना बराच कालावधी जाणार आहे. तरी रिझर्व्ह बॅंकेने सूचित केल्याप्रमाणे पुढील तीन महिने सर्व प्रकारच्या कर्जावरील तीन हप्त्याची वसूली थांबवून त्या तीन हप्त्याचे व्याज माफ करावे. .
सध्याच्या घडीस देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. तसेच लॉक डाउन कधी संपेल याची ही खात्री नाही.
तसेच पुढील वेतन लवकरच होतील अशीही खात्री देता येत नाही. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून आयकर कपात ही झाली आहे. तसेच या महिन्यात मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. त्यामुळे आपल्या संस्थेचा कर्जाचा हप्ता कपात झाल्यास हातात मिळणारे वेतन हे तुटपुंज्या स्वरूपाचे असणार आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवणे जिकरीचे जावू शकते. आशा कठीण आर्थिक समस्येतून सभासदांकडून आपल्या संस्थे कडून चांगल्या अपेक्षा आहेत.
अशा स्वरूपाचे निवेदन शिक्षक भारती सांगली चे जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार व महानगर अध्यक्ष आरीफ गोलंदाज यांच्या वतीने शिक्षण सेवक सोसायटी व पतसंस्थाना देण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व पगारदार शिक्षक सेवक सोसायटी व पत संस्थानी कर्जाच्या हफत्यास स्थगिती द्यावी- शिक्षक भारती
