कोल्हापूर (प्रतिनिधी गोरख कांबळे)देशामध्ये व राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची आकडेवारी वाढत असलेली दिसत आहे याच धर्तीवर सीमा भागातील अनेक गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सतत वाहतूक व्यवस्था चालू असते. पण कागल तालुक्यातील बेळगाव जिल्ह्याच्या सीमा भागातील गावांमध्ये 17 लोक कोरोना बाधित रुग्ण असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याच धर्तीवर आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.यामध्ये कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी, हणबरवाडी,बाळेघोल,बाळीक्रे, अर्जुनी,अर्जुन नगर, चिखली, खडकेवाडा ,कौलगे, सिद्धनेर्ली, वंदूर,शेंडूर,सुळगांव, म्हाकवे, शंकरवाडी,गोरंबे,लिंगनूर दुमाला,करनूर, सुळकुड,व सावर्डे इत्यादी गावे संकेश्वर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे ह्या परिसरातील गावे कंटेनमेंट झोनमध्ये येतात. त्यामुळे सीमेलगत असणाऱ्या चिकोडी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4. वगळता इतर गावातील सर्व रस्ते सतर्कतेचा इशारा म्हणून जीवनावश्यक वस्तू व वाहतुकीसाठी बंद करण्यात बंद करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय उपविभागीय दंडाधिकारी रामहरी भोसले यांनी दिले आहेत.
बेळगाव व संकेश्वर गावांमधून सीमाभागातील गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंची होणारी वाहतूक व्यवस्था बंद.
