मुंबई:-(प्रतिनिधी किशोर कुमावत)कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाने उद्धभवलेल्या स्तिथीत राज्य व केंद्र शासनाकडून येत्या ३मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झाली आहेत.बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही;त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा कामगारांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे.मंडळाकडील नोंदणी असलेल्या सक्रिय बांधकाम कामगारांना थेट खात्यात २००० हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावणे राज्यातील लॉकडाऊन येत्या ३ मे पर्यंत घोषित करण्यात आला आहे.राज्यातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना परत आपल्या घरी पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर अशा अडचणीच्या परिस्थितीत राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा दिला आहे.लॉकडाऊनमुळे राज्यातील इमारत व इतर बांधकमे बंद झालेले आहेत.बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही;त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .त्यांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,कामगारमंत्री व संबंधित अधिकाऱयांच्या बैठकीत अश्या कामगारांना दिलासा देण्यासाठी कामगार मंडळाकडे नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना २०००रु.आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकासकाकडून उपकार वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो.मंडळाकडे जमा उपकार निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाने उद्भवलेल्या स्थित नोंदणी करण्यात आलेल्या राज्यातील एकूण बारा लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगारांना प्रत्येकी २०००रु.प्रमाणे आर्थिक मदत करण्यात येणार आहे.सदरचे आर्थिक सहाय्य नोंदणी असलेली बांधकाम कामगारांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.अशी माहिती मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.जनतेतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
बांधकाम कामगारांच्या खात्यात २०००रु.जमा होणार:ठाकरे सरकारचा निर्णय
