कोल्हापूर प्रतिनिधी:- प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी
शिक्षण प्रसारक मंडळ, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज सेक्रेटरी मा. जयकुमार देसाई, ऍडमिनिस्त्रेटीव ऑफिसर डॉ. मंजिरी देसाई मोरे, पेट्रोन कौन्सिल मेंबर मा. दौलत देसाई , प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, IQAC डिपार्टमेंट यांच्या आदेशानुसार आणि दिलेल्या गाईड लाईन नुसार कोविड१९ लॉक डाउन च्या काळात सर्व प्रोफेसर आणि विद्यार्थी यांनी घरी राहून स्टडी फ्रॉम होम- ऑनलाईन मार्गदर्शनवर्ग घ्यावेत असे सुचवले.
यासाठी व्हाट्सउप ग्रुप, ई-मेल मार्गदर्शन आणि झूम वर्ग याचा अवलंब प्राध्यापकांनी केला. यामुळे कोरोना पासून कसे संरक्षण करायचे, मास्क कसे वापरायचे, गार्जुना मदत करणे, असे छोटे प्रोजेक्ट सहित विद्यापीठ अभ्यासक्रम रिविजन, त्रुटींचे निरसन करणे , नोट्स, पॉवरपॉइंट प्रेसेंटशन मार्गदर्शन ही केले.
सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आपल्या विषयानुसार वर्गनिहाय विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम यानुसार विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क करून कोरोना विषाणू संदर्भात माहिती देऊन कोरोना विषाणू पार्श्वभूमीमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून महाविद्यालयांना २० मार्च २०२० पासून सुट्टी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यामुळे वार्षिक परीक्षाचा लॉक डाउन नंतर विद्यापीठ निर्णय घेईल व त्यानुसार विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, यासाठी अचानक दिल्या गेलेल्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचा विचार करून अभ्यासक्रमातील पाठयांश देऊन याबाबत पालकांना जाणीव जागृती करून, विद्यार्थ्यांनी घरीच थांबावे आणि कोरोना विषाणू पासून बचावासाठी पालक व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार शिक्षक व आप – आपल्या विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना विषय निहाय शिक्षक ऑनलाइन अभ्यास घेत आहे. जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होणार याची काळजी शिक्षक घेत आहेत . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असुन तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे व्हाट्सअप मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे. तसेच दिलेला अभ्यास विद्यार्थी पूर्ण करतो किंवा नाही हे देखील तपासून घेतले जात आहे. यासाठी सर्वशिक्षक, शिक्षिका हे दिलेल्या वेळापत्रकानुसार मार्गदर्शन करण्यासाठी परिश्रम घेत आहे. विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम हा उपक्रम राबवला जात असल्याने ग्रामीण भागातील पालक वर्ग कमालीचे खुश झाले असून त्यांनी उपक्रमशील प्राध्यापकांचे – (डॉ. मंजिरी मोरे, डॉ. माने, श्री. डी. के. नरळे, डॉ. शुभांगी लेंडवे , श्री. पी. पी. सुतार, श्री. झावरे, डॉ. दीपक आवळे, डॉ. स्मिता गिरी, इतर प्राध्यापकवर्ग आणि चिंदे सर)मनापासून अभिनंदन व कौतुक होत आहे! संकटकाळातही प्रोफेसर आपले कर्तव्य बजावताना पाहून मॅनेजमेंट, विद्यार्थी आणि पालकवर्ग समाधानी आहेत.
