कोल्हापूर (प्रतिनिधी। संजय पाटील)सांगली/कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना अवगत करण्यात येते की, मार्च २०२०ची पगार बिले कोषागार कार्यालयाने मंजूर केली असून उद्या पे युनिट कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हेड आॅफीसमध्ये स.११. ००वा चेक जमा करण्यात येणार असल्याचे मा. ढेपे साहेब यांनी कळविले आहे. उद्या तो चेक वटल्यानंतर बँकेच्या संबंधित शाखेकडे रक्कमा वर्ग होऊन सोमवार दि.२०.०४.२०२० रोजी पगार खात्यावर जमा होईल. लाॅकडाऊन मुळे पे युनिट व शिक्षणाधिकारी यांच्या बिलावरील सह्या लाॅकडाऊन संपल्यावर करण्यात येणार आहेत तोपर्यंत मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्या सहीची हार्ड कॉपी बॅंकेला देऊन आपण पगार काढू शकता तशी सूचना पे युनिटने मध्यवर्ती बँकेला दिली आहे. याबाबत सविस्तर पे युनिटने पत्र पोष्ट केले आहे त्याचे अवलोकन करावे.
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिकचा पगार उद्या बँकेत जमा होईल.. पे युनिट कोल्हापूर कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेला मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्या सहीची हार्ड कॉपी घेऊन पगार अदा करणे बाबत कळविण्यात आल्याचे पत्र अधीक्षक यांनी टाकले आहे.
कोरोना प्रतिबंधक लाॅकडाऊन असतानाही सांगली आणि कोल्हापूर शिक्षणाधिकारी लोहारव . तेलंग साहेब, पे युनिटचे मा. विठ्ठलराव ढेपे व मा. म्हस्के साहेब आणि त्यांचे सर्व कार्यालयीन सहकारी यांनी परिश्रम घेऊन मार्च २०२०चा पगार दुरूस्ती प्रक्रिया करून वेळेत केला त्याबद्दल शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य च्या वतीने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच पुणे,सातारा,व सोलापूरचे अपडेट माहिती घेऊन उद्या कळवले जातील:-प्रा. नेमिनाथ धनपालबिरनाळे,उपाध्यक्ष
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य
व टीम शिक्षक भारती.
