कोल्हापूर(प्रतिनिधी संजय पाटील):-आज पुणे विभागातील सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे मार्च २०२० पगारासंदर्भातील अपडेट घेतले.. ते खालीलप्रमाणे
१)सातारा जिल्हा.. दि. १६.०४.२०२० रोजी बिले कोषागार कार्यालयात सादर केली आहेत. सोमवारी/मंगळवारी चेक मिळेल व दि. २३.०४.२०२० पर्यंत खात्यावर जमा होईल अशी माहिती मा. अधीक्षक बनसोडे यांनी दिली आहे.
२)पुणे जिल्हा.. बिले कोषागार कार्यालयात सादर केली आहेत, प्रक्रिया सुरू आहे.. मंगळवार पर्यंत चेक मिळेल व गुरुवार पर्यंत पगार खात्यावर जमा होईल.
३)सोलापूर जिल्हा.. बिले कोषागार कार्यालयात गेली आहेत.. सोमवार /मंगळवार पर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवार /गुरुवार पर्यंत पगार खात्यावर जमा होईल..
लाॅकडाऊन काळात लवकरात लवकर पगार करण्यासाठी सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. क्षीरसागर साहेब, वेतन अधीक्षक मा.बनसोडे साहेब, सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सावंत मॅडम, वेतन अधीक्षक मा. पवार साहेब व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी व शहर व ग्रामीण वेतन पथक अधीक्षक यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले त्याबद्दल तिन्ही जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधव व शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मनःपूर्वक आभार.
प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे
उपाध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र
राज्य.
पुणे ,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील माध्य.व उच्च माध्यमिकची पगार बिले २३ तारखेपर्यंत जमा होतील:-शिक्षक भारती पगार अपडेट..
