सुळकूड(प्रतिनिधी धनंजय चवई) सुळकूड मधील दूधगंगा नदी शेजारी विजापूरहुन खुदाई कामासाठी आलेले १० कुटुंबातील व्यक्ती गेले अनेक दिवस झोपड्या उभारून वास्तवात आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्नाटक राज्यातील विजापूर येथून आलेले १०कुटुंबातील जवळपास ३० खुदाई कामगारांना आहे तेथेच थांबावे लागले.अनेक दिवस लॉकडाऊन असल्याने काम बंद आहे.त्यामुळे त्यांच्याजवळ जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली.ही परिस्तिथी स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटनेच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यांची विचारपूस करून तांदूळ,साखर,गहू,शाळू, भाजीपाला,चहापुड,मसाले अश्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.यावेळी अमोल शिवई, सुयश पाटील, बसवराज हेगाजे, सुहास लगारे, राजेंद्र मुद्दाण्णा, सुरज माळी, प्रशांत खोत, शुभम सरदार आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्तिथ होते