कोल्हापूर प्रतिनिधी:- प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी

नितीन गडकरींचं भाषण- कोरोना कोविड-१९ सद्य परिस्थिती निगडित महत्वाचे मुद्दे-

(1) भारत करोना लढ्यात आघाडीवर. १ महिन्यात लढा संपण्याची शक्यता
(२) सरकारने माल वाहतूक, बंदरे, निर्यात चालू केली
(३) कारखाने (काळजीपूर्वक) चालू करायला परवानगी
(४) ३९ आरोग्य / सुरक्षा वस्तूंचे वेगवान उत्पादन सुरू
(५) चीनमधून येणारा औषधांची कच्च्या मालाची आयात बंद करून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू
(६) सर्व hightech वैद्यकीय उपकरण उत्पादने भारतात तयार होण्यासाठी ४ medical device parks सुरू
(७) जपान चीनमधील इन्व्हेस्टमेंट्स बाहेर हलवणार व अमेरिका चीनकडून आयात थांबवणार. याचा भारतीय उद्योगाला मोठा फायदा होणार
(८) रस्ते बाधकाम वेग दुप्पट करणार
(९) नदी वाहतूक व नदीजोड प्रकल्प चालू होणार
(१०) broadgauge metro सुरू करणार
(११) उद्योगांना १०% जास्त working capital देणार, ३१ डिसें पर्यंत टॅक्स भरण्याची मुदत वाढवणार
(१२) ग्रामीण अर्थव्यवस्थेला priority देणार २ वर्षात ५ लाख कोटी वार्षिक उलाढालीचे लक्ष्य
(१३) पेट्रोल, तेलबिया आयात कमी करण्यासाठी ग्रामीण उद्योगांमार्फत biodiesel / ethanol व तेलबियांचे विक्रमी उत्पादन करणार. दुग्ध, कुक्कुट उद्योग वाढवण्यासाठीही योजना
(१४) electronics व printing paper आयात कमी करण्यासाठी योजना
(१५) भारताला लवकरच ५ trillion सुपरपाॅवर बनवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न सुरू
एकजुटीने योग्य निर्णयाचा पाठपुरावा केला तर भारत या कोरोना कोविड-१९ मधून लवकरच बाहेर येईलच पण भारताची संस्कृती सर्व जगाला वाचवेल !