कोल्हापूर( प्रतिनिधी सुरेश डोणे):-सुगीचा हंगाम चालू झाला की गावामध्ये गोंधळी,बहुरुपी, वासुदेव,नंदीबैलवाले, पिंगळा जोशी असे अनेक कलावंत दाखल होतात.आपली कला सादर करून जे मिळेल ते दान आपल्या पदरात घेऊन समाधान व्यक्त करतात.या कलावंतांनी गेली अनेक वर्षे ही परंपरा झोपासली आहे.शासनाकडून मिळणाऱ्या अनेक सेवा सुविधा पासुन ही मंडळी वंचित आहेत त्याचबरोबर गावामध्ये देखील पूर्वीसारखे दान मिळत नाही.तरीपण या लोकांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे.
सांगोल(ता.पंढरपूर)येथून नंदीबैल वाल्यांच्या दोन कुटुंबातील जवळपास पंधरा व्यक्ती मजल दरमजल करत व आपली कला सादर करत कसबा सांगावं (ता.कागल)येथे गेले एक महिना वास्तवात आहेत.पण सध्या कोरोना रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने ही मंडळी चांगलीच अडचणीत आल्याचे दिसते.गावापासून कोसो दूर आणि वास्तवाच्या ठिकाणापासुन बाहेर पडता येत नाही त्यामुळे “सांग सांग भोलानाथ ,पाऊस पडेल का ” म्हणण्याऐवजी “सांग सांग भोलानाथ, मदत मिळेल का ” अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे.पण, “देव तारी त्याला कोण मारी” या प्रमाणे ही परिस्थिती श्री कृपा इंडस्ट्रीज परिवार व ग्राम रोटरी क्लब यांच्या लक्षात आली.त्यांच्यावतीने ह्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू (साखर,ज्वारी,गहू, येशेल तेल ,साबण,डाळी, भाजीपाला)तसेच जनावरांना ओला चारा यांची मदत करण्यात आली.
यावेळी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.नाळे साहेब,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री.कदम साहेब, उद्योजक श्री.संभाजी कोपार्डे, ग्राम रोटरी क्लबचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मदतीसाठी नंदीबैल वाल्यांच्या कुटुंबियांकडून आभार व्यक्त करण्यात आले.