आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीत पुन्हा सोमवार व मंगळवार या दिवशी जनता कर्फ्यु आळंदी नगरपरीषद व पोलीस प्रशासनाने जाहीर केला आहे. गुरुवार व शुक्रवार या दिवशी जनता कर्फ्युला नागरीकांनी प्रतिसाद दिला असुन पुन्हा आता सोमवार (दि.२० )व मंगळवार (दि२१ ) या दिवशी पुन्हा ताळंदीत गुरुवार व शुक्रवार प्रमाणे दोन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे.अशी माहीती मुख्याधिकारी समिर भुमकर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी दिली.
जनता कर्फ्यु काळात आळंदी परीसर संपुर्ण पणे लाँंकडाऊन बंद ठेवण्यात आला.या काळात नागरीकांनी घरी राहुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. १६ व १७ एप्रिल ला आळंदी बंद काळात सर्वानी सहकार्य केले .यात केवळ मेडीकल दुकाने व हाॅॅस्पिटल वगळण्यात आली होती.
यावेळी मुख्याधिकारी सनिर भुमकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी आळंदीकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन करीत संवाद साधला होता. आळंदी लगतचे महापालीका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चे उपाय योजना आळंदीतही केल्या जात आहेत.याचाच भाग म्हणुन आळंदी शहर पुन्हा २० व २१ एप्रिल ला दोन दिवस पुर्ण पणे जनता कर्फ्यु जाहीर करीत आळंदी शहर बंद ठेवले जाणार आहे.नागरीकांनी यापुर्वी जसे प्रशासनास सहकार्य केले आहे असेच सहकार्य पुढे ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सर्व प्रकारचे नियम नागरीकांनी पाळावेत.यात सोशल डिस्टंसिंग ,गर्दी न करता दुकानांतुन अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करावी .मात्र बंदचे काळात विनाकारण रस्त्यावर फिरतिना दिसल्यास कारवाई केली जाणार आहे. आळंदीत दुचाकींवर कारवाई करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी सांगितले.
सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी आळंदीतील सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन मुख्चाधिकारी समिर भुमकर यांनी सांगितले आहे. अत्यावश्यक साहित्य, किराणामाल, भाजीपाला ,फळे दुकानांचे समोर गर्दी न करता खरेदी करुन बंद च्या काळात घरी सुरक्षित रहाण्याचे आवाहन मुख्याधिकारी समिर भुमकर व वरीष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी केले आहे.
कोरोना प्रार्दुवभाव रोखण्यास आळंदी दोन दिवस पुन्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आला.या अंतर्गत सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आळदी मुख्याधिकारी समिर भुमकर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी आवाहन केले होते.
आळंदीत गुरुवार दि.१६ व शुक्रवार दि.१७ ला शहरात जनता कर्फ्यु ला सहकार्य केले.असेच सहकार्य यापुढे यापुढेही नागरीकांनी द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.कोणीही घराबाहेर विना कारण फिरु नये.अन्यथा कारवाई केली जाईल .नगरपरीषद व पोलीस प्रशासनास सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी नगरपरीषद मुख्याधिकारी समिर भुमकर व आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी आळंदीतील नागरीकांना आवाहन केले आहे.