औरंगाबाद – कोरोनाचा संसर्ग वाढतानाच कुटुंबातील रुग्णांची संख्याही लक्षणीय ठरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळलेल्या १२ वसाहतींपैकी आरेफ कॉलनी, किराडपुरा, बायजीपुरा हे भाग अतिसंवेदनशील तयार होत असून, या भागांवर महापालिकेचे अधिक लक्ष असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता.१६) सांगितले. तीन भाग असंवेदनशील महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी

तीन भाग अतिसंवदेनशील

सायंकाळी फेसबुक लाइव्ह पत्रपरिषदेद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी महापौरांनी सांगितले की, आजपर्यंत बारा वसाहतीत कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी आरेफ कॉलनी, किराडपुरा आणि बायजीपुरा हे तीन भाग अतिसंवदेनशील होताना दिसत आहे.

येथे संपर्कातल्या संपर्कातून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाला रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेचा आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य विभागासमोर आहे. पालिकेने या सर्व वसाहतील सील केल्या असून, येथे रोज पालिकेच्या आरोग्य पथकांकडून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे असेही महापौरांनी सांगितले.